धुळ्यात सामूहिक उपनयन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
पाचही बटुंची सकाळी सवाद्य मिरवणूक

धुळे :
नवयुवक सर्व शाखीय ब्राह्मण महासंघातर्फे यंदाही रविवारी ६ रोजी सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पाच बटुंचे सामूहिक उपनयन संस्कार पार पडले.
 
 
पारोळारोडवरील डोंगरे महाराज नगरातील श्री गणेशालय मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सदगुरू पद्मनाभ स्वामी महाराज संस्थानचे मठाधिपती भाऊ महाराज रूद्र, कमलनयन स्वामी महाराज संस्थानचे मठाधिपती संजय बुवा महाराज, शिरपूर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ऍड. सुहास वैद्य आदी उपस्थित होते.
 
 
सामूहिक व्रतबंध सोहळ्यानिमित्त पाचही बटुंची रविवारी सकाळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संजय बुवा महाराज यांनी बटुंना व्रतबंध संस्कार, त्रिकाल संध्या, यज्ञोपवित धारणाचे महत्त्व सांगितले. उपनयन संस्कारानंतर बटुंची आचरण पद्धती कशी असली पाहिजे? याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
 
 
याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष चंदूभाऊ जोशी, पुरोहित आघाडीचे राजू निफाडकर गुरूजी, डॉ. महेश घुगरी, शशी पाठक, निखिल वैद्य, महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी आनंद कुलकर्णी, महेश जोशी, एम. बी. जोशी, अण्णा जोशी, दत्ता कुलकर्णी, नीलेश भंडारी, नटराज जोशी, भूषण देवळे, श्रीराम कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, नाना शुक्ल, सी. पी. भट, स्वप्नील कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, महिला आघाडीच्या शरयू जोशी, शुभांगी जोशी, प्राजक्ता जोशी यांनी परिश्रम घेतले. समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@