बिनविरोधच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

जिनींगसाठी अखेर निवडणूक, सरळ लढत अटळ

जामनेर :
जामनेर तालुका सहकारी जिनींगप्रेसिंग संस्थेची निवडणूक यंदा बिनविरोध करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीर आवाहनाला कॉंग्रेस आघाडीने’वाटाण्याच्या’ अक्षदा दिल्याने अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या संस्थेच्या संचालकांची अखेर निवडणूक होणार आहे.
 
 
मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या व कॉंग्रेस आघाडीचे संजय गरुड,डिके पाटील,एसटी पाटील यांच्या पॅनलमधे समोरा-समोर लढत पाहायला मिळणार आहे.
 
 
१३ मे रोजी होणार्‍या निवडणुकीत १७ संचालक निवडले जाणार आहेत,उमेदवारी अर्ज माघारी नंतर ३५ उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपा व माजी खा.जैन समर्थक उमेदवार- डॉ.सुरेश मन्साराम पाटील,आबा बाबुराव पाटील, विकास भगवान महाजन,परशुराम राजाराम पाटील(सर्व सहकारी संस्था मतदार संघ). रवींद्र उखर्डू पाटील,अरूण भगवान पाटील, अर्जुन रामलाल पाटील, किशोर पंढरीनाथ पवार, प्रदीप महाले, भरत मोतीराम पाटील, शिवाजी त्र्यंबक पाटील (सर्व व्यक्तिश:मतदार संघ). संगीता राजेंद्र पाटील, कल्पना ज्ञानेश्वर पाटील (महिला मतदार संघ), भिका चिंधू कोळी(अनु-जाती मतदार संघ), मंगेश भरत पाटील(इतर मागास मतदार संघ). अमृत शामराव पाटील(आर्थिक दुर्बल मतदार संघ), बिरबल दादा पाटील(विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ)
कॉंग्रेस आघाडीच्या पॅनलचे उमेदवार असे-संजय लालचंद परदेशी, सिताराम श्रीपत पाटील, रवींद्र महारू पाटील, भिका गोविंदा पाटील(सर्व सहकारी संस्था मतदारसंघ). चंद्रकांत जगन्नाथ पाटील, प्रभाकर कडू पाटील, राघो एकनाथ पाटील, भगवान पुंडलीक पाटील, शरद त्र्यंबक पाटील, नाना राजमल पाटील, सचिन भगवान पाटील(सर्व व्यक्तीशःमतदार संघ). लिलाबाई राजधर पाटील, संगीता सुरेश पाटील (महिला मतदार संघ). योगेश माणिकराव पाटील (इतर मागास वर्ग मतदारसंघ). शामराव नामदेव साबळे(विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदार संघ). किरण मगनलाल खैरनार(अनु-जाती-जमाती). पुंडलीक बाबुराव पाटील (आर्थिक दुर्बल) . बिनविरोधचा प्रयत्न फसल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस आघाडीला समोरा-समोर लढत द्यावी लागेल. सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@