ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे ८ बटूंचा उपनयन संस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

 
 
जळगाव :
ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे रविवारी, ६ मे रोजी अप्पा महाराज समाधी मंदिरात ८ बटूंचा उपनयन संस्कार झाला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वा. पुरोहितांच्या मंत्रोउच्चाराने झाली. यावेळी अमोल जोशी, अशोक वाघ, लेखराजजी उपाध्यक्ष, बहुभाषिक संघाचे अध्यक्ष संजय व्यास, सुरेंद्र मिश्रा आदी उपस्थित होते. पौराहित्य प्रमुख रवी जोशी, रवींद्र नाईक यांनी केले. यात मातृभोजन होमहवन, भिक्षावळ, सोडमंज यासह बटूंना कसे वागावे, याबाबतचे संस्कार देण्यात आले. सोहळ्यात श्रीराम मंदिराचे प्रमुख गादीपती मंगेश महाराज व ह.भ.प.मुकूंद धर्माधिकारी व आ.सुरेश भोळे यांचे आशीर्वाद बटूंना लाभले.
 
 
व्रतबंधानिमित्त बटूंना ब्राह्मण संस्थेच्या अध्यक्षा रेखा कुलकर्णी, कोषाध्यक्ष अविकुमार जोशी, उपाध्यक्ष विद्या धर्माधिकारी व उपाध्यक्ष वसंतराव देखणे, ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे पुस्तके व पेन भेट तर किशोर वाकलेकर यांच्यातर्फे बटूंस तांब्याचे फुलपात्र देण्यात आले.
 
 
यशस्वीतेसाठी अशोक कुळकर्णी, हेमंत कानगो, स्मिता कुळकर्णी, सविता काळे, अजय कुळकर्णी, महिला मंडळाच्या अमला पाठक, मानीनी तपकिरे, नम्रता वाघ, हेमलता कुळकर्णी, कविता कुळकर्णी, आशा बिडकर, ममता जोशी, ऋतुजा संत यांचे सहकार्य लाभले.
 
@@AUTHORINFO_V1@@