ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2018
Total Views |

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ...

 
 
मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे आज मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. एका दिग्गज भावगीत गायकाला महाराष्ट्र मुकला अशा भावना व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दाते आजारी होते. मुलगा अतुल दाते यांच्यासोबत ते मुंबईत राहत होते. आज पहाटे ६ वाजता त्यांना राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी...', 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी....' 'दिवस तुझे हे फुलायचे...', 'स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला ...' आणि 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...' अशा अनेक भावगीतांनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. 
 
 
 
 


अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३४ रोजी झाला. त्यांचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धार येथे कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास केला. अभियांत्रिकी करत असतानाच वडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले.
 
 
अरुण दाते यांना ज्येष्ठ संगीतकार गजानन वाटवे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ८ जून २०१० रोजी प्रदान करण्यात आला होता. प्रख्यात संगीतकार यशवंत देव यांच्या हस्ते हा पुरस्कार पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना देण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी दाते यांनी केेलेले भाषण -
 
 
 
 
अरुण दाते १९५५ पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. १९६२ मध्ये शुक्रतारा मंदवारा ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. या गाण्यामुळे दाते यांना खूप प्रसिद्धी मिळाली. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही ‘शुक्र तारा’ गाऊ लागले. अगदी अलिकडे २०१० पर्यंत अरुण दाते यांचे 'शुक्रतारा' या नावाने होणार्‍या मराठी भावगीत गायनाचे २५०० हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हटले जाते ते याचसाठी. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. 
 
 
 
 
 
अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. मूळ १९८६ साली प्रसिद्ध झालेले हे आत्मचरित्र २६ मे २०१६ रोजी नव्याने प्रकाशित करण्यात आले. अरुण दाते यांना २०१० मध्ये पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार प्राप्त झाला होता तर शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार २०१६ मध्ये प्रदान करण्यात आला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@