कॉंग्रेस देशाचे तुकडे करणाऱ्यांच्या समर्थनात उभी राहिली होती – नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2018
Total Views |

 

जामखंडी (कर्नाटक) : कॉंग्रेस पक्षाचे नेते देशाचे तुकडे करणाऱ्यांच्या समर्थनात उभे राहिले होते, “भारत तेरे टुकडे होंगे” अशा घोषणांची पाठराखण केली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. जामखंडी येथे कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराची सभा सुरु आहे.

कॉंग्रेस पक्षाने देशाच्या सैन्यावर देखील शंका उत्पन्न केली होती. पाकव्याप्त काश्मिरात घडलेल्या सर्जिकल स्ट्राईक विषयी देखील टीका कॉंग्रेस नेत्यांनी केली होती, याची आठवण आज पंतप्रधान मोदींनी कर्नाटक सहित देशाच्या जनतेला करून दिली आहे. कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या नीतीला बळी पडू नये. संपूर्ण कर्नाटक जातीच्या नावाखाली विभागले गेलेले आम्हाला पाहायचे नाही, अशी विनंती देखील मोदीयांनी केली.

 
कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी जोरात रंगली आहे. कॉंग्रेसतर्फे सिद्धरामय्या, आणि राहुल गांधी यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात जनसभा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर भाजपतर्फे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आणि येडीयुरप्पा यांच्याद्वारे अनेक प्रचारसभा घेतल्या जात आहेत. पंतप्रधान आज १२ ठिकाणी संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर अमित शाह यांच्या 4 ठिकाणी प्रचार यात्रा आयोजित केल्या आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@