उत्तरेतील वादळाचे संकट आणखी पाच दिवस कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा



नवी दिल्ली :
गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेमध्ये सुरु असलेल्या वादळाचा प्रभाव पुढील पाच दिवसांपर्यंत कायम राहणार असून नागरिकांनी या दरम्यान सावधगिरी बाळगावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान या वादळामुळे आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला असून हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या बुधवारी राजस्थानमध्ये अचानक निर्माण झालेले हे वादळ संपूर्ण उत्तर भारतामध्ये पसरले आहे. याचा सर्वात अधिक फटका हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांचा बसला आहे. त्या पाठोपाठ दिल्ली, हरियाणा, बिहार आणि प.बंगालच्या काही भागामध्ये या वादळाचा काही प्रमाणात प्रभाव पडला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये या वादळामुळे तब्बल १२१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. वादळाबरोबरच येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.




दरम्यान केंद्र सरकारकडून या वादळाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याघटनेवर दु:ख व्यक्त करत, वादळामध्ये जीव गमावलेल्या सर्व नागरिकांना पंतप्रधान मदतनिधी मधून रुपये २ लाख तर जखमींना रुपये ५० हजार मदतनिधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी देखील मृतांना मदत जाहीर केली आहे.



@@AUTHORINFO_V1@@