कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना २० मे पर्यंत मुदतवाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

एक रकमी कर्ज योजनेसाठी देखील वाढीव मुदत

 ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे निर्देश





बुलडाणा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी अर्जासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली असून अर्ज सादर करण्यास २० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेसाठी अर्ज सादर करण्यास ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेत आपले अर्ज तातडीने जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासने केले आहे.


दरम्यान भरण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम केंद्रावरून सदर अर्ज घ्यावेत, असे प्रशासनाने म्हटले आहे. हे नि:शुल्क स्वरुपात पुरविण्यासंबंधी या सर्व केंद्रांना आदेश देण्यात आले असून हे अर्ज ऑनलाईन शेतकऱ्यांना नि:शुल्क भरून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. किंवा शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा http://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येईल, असे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@