जि.प.मधील पॉलिमर बेंचेस निविदा प्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

पाच जिल्हा परिषदांकडून नियम, अटी मागविले

जळगाव, ४ मे :
शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळांना प्लॅस्टिकचे पॉलिमर बेंचेस पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येत असलेली निविदा प्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात सापडली असून यासंदर्भात पाच जिल्हा परिषदांकडून नियम, अटी मागविण्यात आले आहेत. यानूसारच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
 
 
जिल्ह्यातील अमळनेर, बोदवड, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, जामनेर या ७ तालुक्यांचा या कार्यक्रमांतर्गत पॉलिमर बेंचसाठी समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यातील १० शाळांना प्रती शाळा २५ पॉलिमर बेंचेस मिळणार आहे. एकंदरीत ७ तालुक्यातील ७० शाळांना १७५० पॉलिमर बेंचेस या कार्यक्रमांतर्गत वाटप करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात ५ वी ते ८ वीच्या १० शाळांना २५० बँचेस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेत ९७ लाखांच्या कामाची निविदा मॅनेज करण्याच्या दृष्टीने चुकीच्या अटी लादण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आ.चंद्रकांत सोनवणे यांनी सीईओ शिवाजी दिवेकर यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर तीन निविदाधारकांकडून नमुने प्राप्त झाले आहेत.
 
 
टेंडरच्या गोपनियतेचा भंग
यात तृप्ती उद्योग, वरद इंटरप्रायजेस, रितेश स्टिल या कंपनीचे बेंच नमुने आहेत. मात्र ई-टेंडरींग प्रणालीनूसार निविदाधारकाची संपूर्ण माहिती गोपनीय असणे गरजेचे आहे. परंतु शिक्षण विभागाने टाकलेल्या नमूना तपासणीच्या अटीमूळे ई-टेंडरींगमधील निविदाधारकांचे विवरणच समोर आले असल्याने गोपनीयतेचा भंग झाला असल्याचे दिसून येते. आता पाच जिल्हा परिषदांकडे या निविदेबाबत नियम व अटी मागविण्यात आल्या आहेत. निकषानुसारच जिल्ह्यातही निवीदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@