या 'पॉवरफुल्ल' पत्रामुळे भुजबळांची सुटका !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

पवारांचे पत्र वायरल



राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना तब्बल दोन वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने काल जामीन मंजूर केला आहे. भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये भुजबळ समर्थकांकडून आंदोत्सव साजरा केला जात असतानाच सोशल मिडीयावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एक पत्र सध्या वायरल होत आहे. भुजबळ यांच्या प्रकृतीसंबंधी चिंता व्यक्त करणारे हे पत्र पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले असून या पत्रामुळेच भुजबळांच्या सुटका झाली असल्याची चर्चा सध्या सोशल मिडियावरती रंगत आहे.

पवारांचे हे पत्र गेल्या मार्च महिन्यामधील असून मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिले आहे. यामध्य पवारांनी भुजबळ यांच्या आरोग्य विषयी चिंता व्यक्त केली असून राज्य सरकार त्यांच्या आरोग्याकडे योग्यरित्या लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'भुजबळ हे सध्या ७१ वर्षांचे असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक अशी आहे. परंतु कारागृहामध्ये त्यांच्या आरोग्याकडे योग्यरित्या लक्ष दिले जात नाही. भुजबळ यांना न्यायालयाने अद्याप दोषी घोषित केलेले नाही. त्यामुळे न्यायालय जोपर्यंत त्यांना दोषी ठरवत नाही, तो पर्यंत भुजबळ हे निर्दोष आहेत. तसेच त्यांना योग्य वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांच्या न्याय्य हक्क देखील आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे गरजे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच तुरुंगामध्ये त्यांच्या प्रकृतीला कसलाही त्रास झाल्यास त्याला पूर्णतः राज्य सरकारच जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी या पत्रात दिलेला आहे. तसेच भुजबळ यांच्या कार्यांचा उल्लेख करत, जनसामन्यांमधील त्यांच्या प्रतिमेला दुर्लक्षित करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@