जैन इरिगेशनला ७० कोटींचा प्रकल्प : ८०८६ एकर क्षेत्र ओलिताखाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

वाघुर-असोदा गटातील ‘फ्युचर रेडी मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट’
तीन हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍यांना होणार लाभ

जळगाव, ४ मे :
भारतातील सगळ्यात मोठी सिंचन कंपनी आणि शेतीव्यवसायात अग्रेसर जैन उद्योग समूहाची वाघूर-असोदा शाखा कालवा आणि असोदा वितरण दाब पाईप वितरणासह महाराष्ट्रातील आणखी एका ‘फ्युचर रेडी मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट’ साठी निवड करण्यात आली आहे.
 
 
या ‘भविष्य प्रतिबद्ध सूक्ष्मसिंचन प्रकल्प’ अंतर्गत असोदा परिसरातील ८ हजार ०८६ एकर क्षेत्राला आणि ३ हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाचे मूल्य ७०.३६ कोटी रु. आहे. या आधी भादली कालवा आणि महाराष्ट्र सरकारच्या जलसंसाधन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तापी इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जळगाव यांच्या अंतर्गत सिंचन वितरण पाईप प्रकल्पांचे काम जैन इरिगेशनला मिळालेले आहे.
 
 
या एकात्मिक प्रकल्पात कालव्याशेजारी पंप हाऊसेसचे बांधकाम करणे, ७.५ किमी लांबीची पाईपलाईनची गुरूत्वाकर्षण तत्वावर १००० एमएमपेक्षा अधिक व्यासाच्या पाईप्सचा पुरवठा आणि उभारणी, दाब असलेले एचडीपीई आणि पीव्हीसी पाईपांचे जाळे प्रत्येक शेतकर्‍याच्या बांध्यापर्यंत उभारणे, वीजेची वितरण तारा, सबस्टेशन्स, ट्रान्सफॉर्मर्स केंद्रे आणि त्यासंबंधी पायाभूत सुविधांचा पुरवठा व उभारणी, पाणी वापर संस्थांची स्थापना व त्यासंबंधी विभागीय अधिकारी व पाणी वापर संस्था यांना प्रशिक्षण आणि प्रकल्पाची सुरुवात आणि देखभाल ५ वर्षापर्यंत केली जाणार आहे.
 
 
महाराष्ट्र सरकारच्या पीडीएन जीआरनुसार हा वाघूर-असोदा वितरण आणि असोदा कालवा दाबयुक्त एचडीपीई/पीव्हीसी पाईप वितरण प्रकल्पाची ८०८६ एकरच्या कमांड एरियात अंमलबजावणी केली जाईल. या प्रकल्पामुळे पाईपाव्दारे पाणी शेतापर्यंत पोहचवले जाईल. त्यामुळे कालव्यातून होणारी पाणी गळती आणि चोरीला मोठा आळा बसेल. नळ वितरण आणि ऑनफॉर्म सूक्ष्मसिंचन (ठिबक/तुषार) प्रणालीव्दारे वाढवली जाईल.
 
 
असोदा कालवा आणि डीवाय कालव्यातून पाणी उचलले जाईल आणि कमीतकमी २० मीटर रेसिड्युअल हेडने प्रत्येक शेतकर्‍यांच्या शेतात पोहोचेल. त्यामुळे ही एक ‘फ्युचर रेडी’ प्रणाली असेल आणि शेतकर्‍यांना या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर सूक्ष्मसिंचन प्रणाली स्वीकारता येईल. हा प्रकल्प ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ (पीएमकेएसआय) आणि ‘पाणी थेंबाने, पीक जोमाने’ हे राष्ट्रीय ध्येय पूर्ण करतो व पाण्याची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवेल.
प्रकल्प शाश्‍वत राहील
 
 
प्रकल्पात संपूर्ण दाबयुक्त पाईप वितरणासाठी पाईप साहित्याची निवड ‘संसाधने ते मूळ’ या तत्वानुसार नाविन्यपूर्ण रचना वापरण्यात आली आहे. संपूर्ण पाईप वितरण जाळ्यासाठी फक्त एचडीपीई व पीव्हीसी पाईपच वापरण्यात येतील. एचडीपीई पाईपचे आयुष्य १०० वर्षांपेक्षा जास्त असते तर पीव्हीसी पाईपचे आयुष्य ५० वर्षांपेक्षा अधिक असते. यामुळे पाईप वितरण जाळ्याचे आयुष्य ५० वर्षांपेक्षा अधिक (कमीतकमी ५० वर्षे) असेल व प्रकल्प शाश्वत राहील,
अतुल जैन, संयुक्त कार्यकारी संचालक,
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
 
 
@@AUTHORINFO_V1@@