‘फुट पाडा आणि राज्य करा’ यावर काँग्रेसचा विश्वास आहे : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
शिवमोगा : ‘फुट पाडा आणि राज्य करा’ यावरच काँग्रेसचा विश्वास आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले. आज कर्नाटक येथील शिवमोगा येथे जनसभेला संबोधित करतांना ते बोलत होते. नागरिकांना जातीच्या आधारावर काँग्रेस वेगळे करते तसेच अपराध्यांचे देखील जातीच्या आधारावर काँग्रेस वर्गीकरण करते असे मत यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या जनसभेला ते संबोधित करत होते.
 
 
 
 
  
 
काँग्रेसचे लोकं, कार्यकर्ते जेथे जातात तेथे ते खोटे पसरवितात तसेच लोकांमध्ये असंतोष निर्माण करतात असा आरोप यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. भाजपचे कर्नाटक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांच्याबद्दल काँग्रेस अपमानास्पद शब्द प्रयोग करीत आहे. काँग्रेसला एखाद्या चांगल्या नेत्याची प्रशंसा करता येत नाही. येडीयुरप्पा हे चांगले व्यक्तिमत्व आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
 
@@AUTHORINFO_V1@@