खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती देणार्‍यास रोख बक्षीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |
अमळनेर, ४ मे :
शहरातील न्यू प्लॉट भागात डॉ.हजारे यांचे ऍक्सीडेंट हॉस्पिटलसमोर रोडवर दिपक देवराम पाटील (वय ४२ रा. सिध्दि विनायक कॉलनी) यांना ३ मार्च २०१८ रोजी रात्री १० ते ४ मार्चच्या रात्री ३ वाजेच्या दरम्यान आरोपी राज वसंत चव्हाण रा. प्रताप कॉलेज वळ या सराईत गुन्हेगाराने मारहाण करुन जिवेठार मारले असून गुन्हा घडल्याच्या दिवसापासून आरोपी फरार आहे. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
तसेच ३ मे रोजी रात्री ११.३० ते १२ वाजे दरम्यान अलि अजगर हकीमोद्दीन बोहरी वय ५३ रा. स्टेशन रोड अमळनेर या पेट्ोलपंप मालकास वैयक्तीक संबधातुन व पैशाचे व्यवहारातुन वर नमुद सराईत गुन्हेगार राज वसंत चव्हाण याने त्यांच्याकडील पेट्ोलपंपाचे पैशाची पिशवी लुटण्यासाठी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांना जिवे ठार मारले असल्याचा पोलिसांना संशय आहे. फरार संशयीत आरोपी राज चव्हाणयाची माहिती देणार्‍यास योग्य ते रोख स्वरुपात बक्षीस देण्याचे चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, अजगर बोहरी यांच्यावरील गोळीबार प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
@@AUTHORINFO_V1@@