बाबा बोहरी यांच्या खुनामुळे अमळनेरात दहशतीचे सावट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

आरोपी निष्पन्न न झाल्यास पोलीस ठाण्यास टाळे ठोकणार
आ. स्मिता वाघ यांचा इशारा; कायदा सुव्यवस्था ढासळली


जळगाव/ अमळनेर, ४ मे :
शहरातील हकिमोद्दीन मुल्ला कादर भाई पेट्रोल पंपाचे मालक अली अजगर उर्फ बाबा बोहरी यांची गोळ्या झाडून झालेली निर्घृण हत्त्या अतिशय दुर्देवी आणि शहरवासियांमध्ये दहशत निर्माण करणारी असून वाढत्या गुन्हेगारीचेच हे संकेत आहेत.
पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेणे अपेक्षित असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे .येत्या सात दिवसात मारेकरी कोण हे निष्पन्न न झाल्यास पोलीस ठाण्याला टाळे ठोकणार असा सज्जड इशारा आ. सौ. स्मिता उदय वाघ यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिला.
 
 
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ सौ वाघ यांनी म्हटले आहे की गुन्हेगारीच्या या वाढत्या घटनांमुळे शहरात पोलीस यंत्रणा आहे किंवा नाही याबाबत संशय वाटू लागला आहे.साधा दुचाकी चोरीचा गुन्हा देखील येथील पोलीस उघडकीस आणू शकत नाही हे दुर्देव आहे.शहरात प्रा. दीपक पाटील यांच्या हत्येस दोन महिने लोटुनही पोलीस मारेकर्‍यांचा शोध लावू शकले नाही यामुळे नागरिकांनाही आता त्यांच्या कार्यशैलीवर शंका येऊ लागली आहे.
 
 
शहरात अनेक उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी रात्री आपले काम आटोपून घरी जावे लागते.त्या सर्वांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रा दीपक पाटील खून प्रकारणासह या घटनेचा उलगडा होणे गरजेचे आहे. पूज्य सानेगुरुजींची कर्मभूमी आणि संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी अशी ओळख या अमळनेर शहराची असताना येथे पोलीस यंत्रणा बिनकामी झाल्याने गुन्हेगारीची भूमी अशी ओळख या शहराची झाली आहे.
 
 
अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय
अवैध दारू, सट्टा यासह अनेक अवैध धंदे सर्रास सुरु आहेत.शहर व ग्रामीण भागात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री वाढली असताना अनेक गावाच्या महिलांनी दारू बंदीसाठी अर्ज दिले आहेत.परंतु कोणतीही दखल पोलिसांनी घेतलेली नाही. खरेतर पोलीस यावर अंकुश ठेवण्याएवजी आपले हात ओले करून अवैध धंद्यांना बळकटीच देत असल्याचे बोलले जात आहे.एवढेच नव्हे कायदा व सुव्यवस्था राखण्यापेक्षा खाजगी प्रवासी वाहतूक, अवैध दारू, सट्टा याकडे फायद्यासाठी अधिक लक्ष दिले जात आहे.यामुळे येथील पोलीस अधिकारी यंत्रणेवर जनतेचा रोष असून या गुन्ह्यातील आरोपींचा त्वरित शोध घ्यावा आणि शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश घालावा, अन्यथा पोलिस ठाणे बंद करण्यात येईल असा इशारा आ. स्मिता वाघ यांनी दिला आहे.
 
सामान्य नागरिक दहशतीखाली
यात्रोत्सवाच्या काळात पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे भासविले जात असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भर रस्त्यावर एका पेट्रोल पंप चालकाची हत्या होत असेल तर नागरिकांनी उद्योग धंदे करावे कसे?आणि जगावे तरी कसे? हा प्रश्नच आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@