प्रमोशन मिळाले म्हणून हुरळून नका जाऊ ! जबाबदार्‍यातही होते वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

प्रमोशनमुळे कर्मचार्‍याचा वाढतो समाजातील लौकिक
प्रमोशननंतर आवडीचे काम न मिळाल्यास उत्पादनक्षमतेवर परिणाम

 

काही कर्मचारी स्वत:हून टाळतात प्रमोशन
सोन्याच्या मागणीत १२ टक्के घट
प्रमोशन (पदोन्नती) मिळाले की कर्मचारी आनंदून जात असतात. कारण वरची जागा व त्याबरोबरच वेतनातही घसघशीत वाढ मिळतेच, त्याचबरोबर कार्यालयातील वटही वाढते! तसेच आर्थिक परिस्थितीही सुधारते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी हा नेहमी प्रमोशनची वाट पाहत असतो. त्याला अधिक आवडीचे काम मिळत असते. समाजातील लौकिकही वाढत असतो. असे असले तरीही अनेक कर्मचारी हे प्रमोशनमुळे हुरळून न जाता ते टाळण्याचाच प्रयत्न करीत असतात. यामागे अनेक कारणे आहेत.
 
प्रमोशनबरोबरच वाढत्या जबाबदार्‍याही येत असतात. वरच्या साहेबा(बॉस)च्या अपेक्षाही वाढत जातात.त्याच्या अपेक्षा जर पूर्ण करता आल्या नाहीत तर मोठी अडचण होत असते. काही वेळा तर करियरवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. न आवडणारे कामही कधी कधी करावे लागत असल्याने तणाव वाढत जातो. क्षमता आणि उत्साह यांची पातळीही घटते. कामगिरी (परफॉर्मन्स) जर करुन दाखविला नाही तर करिअरही धोक्यात येऊ शकते.
 
 
म्हणून प्रमोशननंतर आपल्या आवडीचे काम मिळणे आवश्यक असते. जर आपणास कामामध्ये आवड नसेल तर उत्पादकते(प्रॉडक्टिव्हिटी)वरही परिणाम होतो. आपल्या आवडीचे काम नसेल तर नाही म्हणणे परवडते. यामुळेच काही ठिकाणी कर्मचारी हे स्वत:हून प्रमोशन नाकारीत असतात. प्रमोशननंतर कोणते काम मिळेल हे आधीच माहित झाले पाहिजे. प्रमोशन जर करियरच्या लक्ष्यापासून भटकत राहणार असले तर त्याला नाही म्हणणेच उपयुक्त असते.
 
 
काही वेळा प्रमोशनवर बदलीचे संकटही असते. बदलीमुळे संपूर्ण जीवनाची घडी विस्कटते. काही हजारांसाठी लाखो रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ येत असते. प्रमोशन नाही मिळाले तरी काही वेळा फारसा फरक पडत नसतो. केवळ पगारवाढीसाठी प्रमोशन घेणे योग्य नसते. म्हणून प्रमोशन घेण्याआधी आपल्या बॉसशी अवश्य विचारविनिमय केला पाहिजे. प्रमोशन न घेण्यामागील कारणमीमांसा त्याला स्पष्ट करुन द्यावी. प्रमोशन घेतल्यानंतर हाताखालच्या (कनिष्ठ) कर्मचार्‍यांना मॅनेज करणे शक्य होत नाही. आपल्याला कोणते काम आवडते ते देखील त्याला सांगून टाकले पाहिजे.
 
 
सोन्याच्या व्यवहारांमध्ये सध्या सुस्त परिस्थिती आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटल्यानुसार मार्च तिमाहीत सोन्याची देशांतर्गत मागणी ११५.६ टन इतकी (१२ टक्क्यांनी कमी) राहिली होती. मार्च तिमाहीत सोन्याची जागतिक मागणीही १५ टक्क्यांनी घसरली आहे. भारतात यावर्षी ७०० ते ८०० टन सोन्याची मागणी राहणार असल्याचे अनुमान आहे.
 
 
तज्ञांच्या म्हणण्यानुसार वाढत्या किंमतींमुळे सोन्याची मागणी घटलेली आहे. रुपया कमकुवत झाल्याने भारतात सोने महाग झाले आहे. सोन्याच्या मागणीवर वस्तू आणि सेवा करा(जीएसटी)चाही परिणाम झाला आहे. जीएसटीचा फटका असंघटित ज्वेलर्सना बसलेला आहे. ग्राहकांमध्येही जीएसटी बाबत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. नोंदणीविषयक नियमां (लिस्टिंग रुल्स)चे काटेकोर पालन न करणार्‍या कंपन्यांविरोधात भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी) कारवाई करण्याच्या स्थितीत आहे. लिस्टिंगच्या बाबतीत सेबीने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत सेबी प्रवर्तकां(प्रमोटर्स)ची संपत्तीही जप्त करु शकते. एवढेच नव्हे तर सेबी अशा कंपनीला डिलिस्ट(नोंदणीबाह्य)ही करु शकते. याशिवाय एक्सचेंजच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या कंपन्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते. त्यांच्या शेअर्सचे व्यवहार(ट्रेडिंग)ही थांबविले जाऊ शकतात. नवीन नियम येत्या सप्टेंबर २०१८ पासून लागू केले जाणार आहेत.
 
 
तसेच जर कंपनीने महिला संचालकांना नियुक्त केले नाही व दोन तिमाहींपर्यंत ऑडिट कमिटी (लेखा समिती) गठित केली नाही तर एक्सचेंज कंपनीवर प्रतिदिन १००० रुपये ते ५००० रुपयांपर्यंत पेनल्टी (दंड) ठोठावू शकते. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीविषयी आगाऊ सूचना देण्यात आली नाही किंवा डिव्हिडंड (लाभांश) देण्याची तारीख जाहीर केली नाही तर कंपनीला दहा हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
 
आठवड्याचा शेवट मंदीने, निर्देशांकांमध्ये घट, एफ ऍण्ड ओच्या वेळा बदलणार शेअर
बाजाराच्या आठवड्याची अखेर मंदीने झाली. बाजाराचे दोन्ही महत्वाचे निर्देशांक आज घटले. संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स ३५ हजार बिंदूंखाली येत दिवसअखेरीस १८७ बिंदूंनी घटून ३४ हजार ९१५ बिंदूंवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६१ बिंदूंनी घटून १० हजार बिंदूंवर पुनरागमन करीत १० हजार ६१८ बिंदूंवर बंद झाला. तसेच कमोडिटीप्रमाणे वायदा ट्रेडिंग(फ्युचर्स ऍण्ड ऑप्शन्स)ची वेळही रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता निफ्टी व बँक निफ्टी आणि कंपन्यांसह सर्व ऑप्शन्सचे व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहेत. एफ ऍण्ड ओ च्या या नवीन वेळा येत्या एक ऑक्टोबरपासून लागू करण्यात येईल.
 
@@AUTHORINFO_V1@@