भुसावळला प्रतिष्ठा महिला मंडळाच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

 
 
भुसावळ, ४ एप्रिल :
येथील प्रतिष्ठा महिला मंडळतर्फे महिलांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करण्याकरीता यंदा २ दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
 
नेहाताई साळी यांनी पहिल्या दिवशी महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम व कुल्फी बनवण्याचे प्रशिक्षण दिले. दुसर्‍या दिवशी इन्स्टन्ट पीठ (ढोकळा, डोसा, इडली,जलेबी वगैरे),वेगवेगळ्या प्रकारचे सरबत शिकवण्यात आले. उद्घाटन जयश्री चौधरी यांनी केले. मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या विविधांगी सामाजिक कार्याची, उपक्रमांची, व्यवसायाभिमुख प्रशिक्षणांची तसेच फूड प्रोसेसिंग, ब्युटी पार्लर, शिवणकाम, फिनाईल व शॅेम्पू बनविणे,वेगवेगळी फुले व त्या पासून बुके तयार करणे असे विविध प्रशिक्षण महिलांसाठी विना मूल्य आयोजित करण्यात आले. आजपावेतो एकूण १२०० महिलांनी याचा लाभ धेतला वअनेकींंनी आपले व्यवसाय थाटले आहे असे सांगितले. सूत्रसंचालन अनिता आंबेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी मनीषा काकडे, सरला सावकारे, सारिका यादव,अर्चना सोनावणे व जानवी काकडे यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@