गटविकास अधिकार्‍यांना अंगणवाड्या तपासणीचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

शेवया प्रकरणी सीईओ शिवाजी दिवेकरांचे पाऊल


 
जळगाव, ४ मे :
जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये चिमुकल्यांना सकस आहार म्हणून पुरविण्यात येणार्‍या शेवया बुरशी व दुर्गंधीयुक्त असल्याची धक्कादायक बाब गुरुवारी शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील यांनी उघडकीस आणली होती. शुक्रवारी या बुरशीजन्य शेवया प्रकरणी जि.प.चे सीईओ शिवाजी दिवेकर यांनी गटविकास अधिकार्‍यांना अंगणवाड्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून दोन दिवसात अहवाल मागितले आहेत. जिल्ह्यात अवधान जि.धुळे येथील महाराष्ट्र महिला सहकारी गृहोउद्योग संस्थेतर्फे शेवयांचा पुरवठा केला जातो. आंबेवडगाव येथील अंगणवाडी क्र.१२० मध्ये निकृष्ट शेवयांबाबत लोहारा-कळमसरे गटातील जि.प सदस्या रेखा राजपूत यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी अंगणवाडीतील मालाची पहाणी करुन पंचनामा केला. याबाबत त्यांनी तालुका बालविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर या शेवयांचे नमुने रावसाहेब पाटील व नाना महाजन यांनी स्थायी समिती सभेत दाखविल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव करण्यात आला होता.
 
 
एकत्रित अहवाल दोन दिवसांच्या आत
तपासणीदरम्यान, अंगणवाडीमधील साठा नोंदवही तसेच अवजड साहित्य नोंदवही, साठा नोंदवहीनुसार प्रत्यक्ष साठा, अंगणवाडीत आढळून येणारा माल, साठ्याचा दर्जा, अंगणवाडीत उपस्थित मुले, पोषण आहाराची दैनंदिन उपलब्धता, प्रत्यक्षात दिला गेलेला आहार आदींबाबत तपासणी करण्यात येणार आहे. यानुसार तालुक्याचा एकत्रित अहवाल दोन दिवसांच्या आत महिला व बालविकास अधिकार्‍यांकडे सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@