१६ गावांसाठी अनेरचे आवर्तन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |

खा.रक्षाताईंच्या उपस्थितीत पाणी सोडणार

 
 
चोपडा, ४ मे :
तालुक्यातील गणपूर, भवाळे, गलंगी, धानोरा प्र, घोडगाव, वेळोदे, कुसंबे, अनवर्दे बु, तगडी, मोहिदा, अजंतीसीम, वढोदा, विटनेर, वाळकी, शेंदनी व मालखेडा या सोळा गावांंना अनेर धरणाचे पाणी खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सुटणार आहे.
 
 
पाणी सोडण्याबाबत चोपडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शशी देवरे, तालुका सरचिटणीस पंकज पाटील, माजी सरचिटणीस शशी पाटील व सोळा गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी खासदार रक्षाताई यांच्याकडे मागणी केली होती.
 
 
रक्षाताईंनी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून या धरणातून पाणी सोडण्याबाबतचे पत्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले. अनेर प्रकल्पामध्ये ७३७ द.ल.घ.फू पाणीसाठा शिल्लक असून या प्रकल्पावर बिगर सिंचनाचे आरक्षण नाही. डाव्या व उजव्या कालव्यावरील सुमारे १७०० हेक्टर जमिनीस उन्हाळी सिंचनाचे नियोजन असून ३५ द.ल.घ.फू. पाणी सोडण्याबाबत विनंती पत्र दिलेले होते. यासंदर्भात निर्णय होऊन उद्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत अनेर धरणातून अनेर नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येईल. रक्षाताईंच्या प्रयत्नामुळे पाणी सोडण्यात आल्यामुळे सर्व सोळा गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@