“वन की बात” केल्यामुळे राज्यातील वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात भरीव वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2018
Total Views |
 
 

 
 
 
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून यशाचे श्रेय जनतेला समर्पित
 
 
मुंबई : राज्यातील जनतेने “मन की बात” ऐकतांना “वन की बात” केली त्यामुळे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनामध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आले. भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्यात दोन वर्षात या क्षेत्रात २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली. याचे सर्व श्रेय शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
 
राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी तसेच याउपक्रमाची माहिती देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 
 
 
 
आपल्याला सर्वांना मिळून हे वृक्ष धनुष्य उचलायचे आहे असे आवाहन करून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, केंद्र सरकारने अतिशय शास्त्रशुद्धपद्धतीने भारतातील वनांचा अभ्यास करून अहवाल जाहीर केला ज्यामध्ये चार क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिले आले. यामध्ये वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनाशिवायवनक्षेत्रात वॉटर बॉडिज निर्माण करणे, बांबू लागवड आणि कांदळवन संरक्षण आणि संवर्धन यांचा समावेश आहे. वन आहे तर जल आहे आणि जल आहे तरजीवन हे लक्षात घेऊन काम करणारा आपला चिंतनशील समाज आहे. दोन वर्षातील लोकसहभागाने राज्याला हे यश मिळवून दिले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@