देशव्यापी ओबीसी जात निहाय जनगणनेसाठी संविधानिक न्याययात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |
देशव्यापी ओबीसी जात निहाय
 
जनगणनेसाठी संविधानिक न्याययात्रा
 ११ मे रोजी मुंबईत ६० हजार ओबींसी एकत्र येणार
जळगाव, ४ मे
देशातील ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. घटनेच्या ३४० व्या कलमानुसार ओबीसीचा सर्वांगिण विकास केवळ जात निहाय जनगणना न झाल्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये झालेला नाही. त्यासाठी ११ एप्रिल २०१८ क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जन्मस्थळ समता भूमी (फुलेवाडा) महात्मा फुले पेठ पुणे येथून प्रारंभ होवून आरक्षण भूमी कोल्हापूर, दिक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई येथे ११ मे रोजी संपन्न होणार असल्याची माहिती भारतीय पिछडा (ओबीसी) शोषीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोरे यांनी शुक्रवारी पद्मालय विश्रामगृहामध्ये घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
ज्ञानेश्‍वर गोरे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, भटके विमुक्त अल्प संख्यांकांना सुरक्षा तथा नागरी हक्क मिळालेच पाहिजे, सर्व मागासवर्गीय आयोगाचे अंमलबजावणी झालीच पाहिजे. या मागण्या घेवून भटके विमुक्त बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार हरीभाऊ राठोड, डॉ.सुषमा अंधारे, ओबीसी जनणना परिषदेचे अध्यक्ष प्रा.श्रावर देवरे, डॉ.बबनराव तायवाडे, प्रदीप ढोबळे, परभणीचे ओबीसी ब्रिगेडचे अध्यक्ष नागोराव पांचाळ असे राज्यभरातील विविध ओबीसी संघटनांना सोबत घेवून संविधानीक न्याययात्रा निघाली आहे. या यात्रेच्या सोबत दहासुत्री मागण्या असल्याचेही प्रदेशाध्यक्ष गोरे यांनी सांगितले. यावेळी विलास काळे, सुनीता काळे, मुकूंद सपकाळे, चंद्रशेखर कापडे, अमोल पिंगळे, जितेंद्र जैन किरण भामरे यांनी उपस्थिती होती.
-
११ मे रोजी छगन भुजबळ यांची उपस्थिती
संपूर्ण राज्यभरातून देशव्यापी ओबीसी जातनिहाय जनगणना अभियानाचा शंखनाद करुन येत्या ११ मे २०१८ रोजी सकाळी महात्मा फुले यांना मुंबई येथील कोळी वाड्यात ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली होती. याचे स्मरण करुन त्याठिकाणी नतसमस्तक होवून पुढे चैत्यभूमी, दादर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन ओबीसींच्या जातनिहाय जनगणना अभियाना सभा होणार आहे. या सभेत ओबीसींचे नेते छगनराव भुजबळ, शरद यादव, कुरुक्षेत्राचे खासदार राजकुमार सैनी, १० आमदार आणि ५० ते ६० हजार ओबीसी बांधव या सभेला उपस्थित राहणार आहे. लातूर येथून दोन रेल्वेमध्ये ओबीसी बांधव येणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@