ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
पुणे : ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मराठी नाट्यसृष्टीला त्यांनी दर्जेदार नाटकांची भेट दिली. मराठी नाट्यसृष्टीला त्यांनी नव्या उंचीवर नेवून ठेवले. दिलीप कोल्हटकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. 
 
 
 
दिलीप कोल्हटकर यांची ‘कवडी चुंबक’, ‘राजाचा खेळ’, ‘मोरूची मावशी’, ‘उघडले स्वर्गाचे दार’ ही नाटके मराठी नाट्यसृष्टीत जोरदार गाजली होती. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी दिलीप कोल्हटकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 
 
 
 
मराठी रंगभूमीवर ठसा उमटवणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांच्या निधनावर संपूर्ण मराठी नाट्यसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@