काँग्रेसच्या मदतीला पाकिस्तान धावला ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |

कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तान सरकारकडून 'टिपू सुलतान'चा स्मृतिदिन साजरा


 
 
 
इस्लामाबाद : अठराव्या शतकातील क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा २१९ वा स्मृतिदिन आज पाकिस्तानात साजरा करण्यात आला. “एका महत्त्वपूर्ण व प्रभावशाली ऐतिहासिक महापुरुष म्हैसूरचे वाघ – टिपू सुलतान यांचे आज स्मरण केले जात आहे. टिपू सुलतान सुरुवातीपासूनच युद्धकलेत पारंगत होते, तसेच शिक्षणातही त्यांना विशेष रुची होती” अशा आशयाचे ट्वीट पाकिस्तान सरकारने आज टिपू सुलतानच्या स्मरणार्थ केले आहे.
 
 
 
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ट्वीट कसे ?

कर्नाटकची निवडणूक केवळ एका आठवड्यावर येऊन ठेपली असतानाच पाकिस्तान सरकारकडून हा स्मृतिदिन साजरा करण्यात आला आहे. टिपू सुलतान भारतात कर्नाटकात होऊन गेला व गेल्या काही वर्षांपासून त्याच्याविषयी निरनिराळे वादविवादही सुरु आहेत. त्यामुळे भारतातील ते देखील निवडणूक सुरु असलेल्या कर्नाटकातील ऐतिहासिक व्यक्तीचा स्मृतिदिन थेट पाकिस्तान सरकारकडून साजरा केला जात असल्यामुळे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
 
 
१० नोव्हेंबर २०१५ या टिपू सुलतानच्या जन्मदिनानिमित्त कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आयोजित केलेल्या एका सोहळ्यावरून भाजप व काँग्रेस पक्षांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. टिपू सुलतान हा क्रूरकर्मा मुस्लिम हुकुमशहा होता, तो प्रचंड हिंदूद्वेष्टा होता, त्याने हिंदूंचा अतिशय मोठा नरसंहार केला होता असे सांगत भाजपने टिपू सुलतानचा जन्मदिन साजरा करण्यास विरोध केला होता. तर ब्रिटिशांविरुद्ध लढणारा पहिला भारतीय योद्धा असे काँग्रेसने टिपू सुलतानचे वर्णन केले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये टिपू सुलतानवरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच पाकिस्तानकडून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न होत आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे इतर वेळी टिपू सुलतानच्या जन्मदिन-स्मृतिदिनाचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसने मात्र आज टिपू सुलतानबाबत कोणतेही ट्वीट केलेले नाही.
 
 
दरम्यान भाजपने पाकिस्तान सरकारच्या या ट्वीटची दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यासाठी खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तान सरकारने तुमच्या हिरोचा गौरव केला आहे, त्याला धर्मनिरपेक्ष ठरवले आहे त्यामुळे आता तुम्हीही बिनदिक्कतपणे ताबडतोब टिपू सुलतानचा जयजयकार करा असा उपरोधिक टोला कर्नाटक भाजपने हाणला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@