जळगावात सोमवारी मेगा अतिक्रमण मोहिम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |
 

 
 
जळगाव, ४ मे :
शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महानगर पालिकेकडून सोमवारपासून महिनाभर मेगा अतिक्रमण मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी मक्तेदाराकडून ४० कामगार घेण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्तांसह अतिरिक्त कर्मचार्‍यांची तयारी करण्यात आली आहे.
 
 
शहरात हॉकर्सच्या अतिक्रमणांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्याला हॉकर्स मोठ्या संख्येने असल्याने या मार्गाला अतिक्रमण प्रचंड आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत सून अपघाताचा धोका देखिल वाढला आहे. याबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत प्रभारी आयूक्त कीशोर राजे निंबाळकर यांनी पुन्हा जळगाव शहरात मेघा अतिक्रमण मोहीम राबविण्याची सूचना दिली आहे. सोमवारपासून ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे.याअंतर्गत कोर्ट चौक ते चित्रा चौक, कोर्ट चौक ते नेहरु चौक, नेहरु चौक ते टावर चौक, टॉवर चौक ते घाणेकर चौक, टॉवर चौक ते चित्रा चौक, सुभाष चौक ते शिवाजी रोड, दाणाबाजार ते सानेगुरुजी चौक, बळीराम पेठ या भागातील नो हॉकर्स झोनमध्ये ही अतिक्रमणाची कारवाई करण्यात येणार आहे.यासह जिल्हा परीषद चौक ते एमआयडीसी, महाबळ रोड, गिरणा टाकी रोड, सिंदी कॉलनी ते बेंडाळे स्टॉप या रस्त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत असे असेल मनुष्यबळ
या मोहीमेत महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे ३२ कर्मचारी मक्तेदाराचे ४० कामगार, नगररचना अभियंते, बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी असा सुमारे १०० अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असणार आहे. यासह अतिक्रमण विभागाचे १ ट्रक १ टॅक्टर व अतिरिक्त चार टॅक्टर देखिल राहणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@