मध्य रेल्वेचा ६ रोजी मेगा ब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |
 
 
मध्य रेल्वेचा ६ रोजी मेगा ब्लॉक
भुसावळ, ४ मे
मध्यरेल्वेच्या कल्याण - दिवा स्थानका दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आणि दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने ६ मे रोजी अप दिशेला जाणार्‍या मार्गावर ११.१५ ते ४.१५ वाजे दरम्यान वाहतुक वर्ग करण्यात आली आहे.
अप दिशेला कल्याण स्थानकाहून अप दिशेला जाणार्‍या रेल्वे गाडया सकाळी १०.५४ ते सायंकाळी ४.१९ वाजे दरम्यान कल्याण ते ठाणे स्थानका दरम्यान संथगतीने धावतील. तसेच या दरम्यानच्या स्थानकांवर थांबतील .पुढे ठाणे ते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल्स दरम्यान गतीने धावतील.मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखेडा स्थानकावर गाडया थांबतील आणि निर्धारीत वेळेपेक्षा १५ मिनीटे उशिराने धावतील.
 
 
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानकातुन डाउन दिशेला धावणार्‍या गाडया सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ वाजे दरम्यान घाटकोपर,विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. तसेच निर्धारीत वेळेपेक्षा १५ मिनीटे उशिराने धावतील.
अप दिशेने धावणार्‍या अतिजलद गाडया या ब्लॉक मुळे २० ते ३० मिनीटे उशिराने धावतील.
 
 
डाउन हार्बर लाईन वरील वाशी, बेलापूर, पनवेल, सीएसटी, वडाळारोड हामार्ग सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजे दरम्यान तसेच बांद्रा, अंधेरी, गोरेगाव मार्ग सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ वाजे दरम्यान स्थगीत करण्यात आला आहे. तर अपदिशेला हार्बर लाईन वरील सीएसटीहून सुटणार्‍या आणि पनवेल, बेलापूर, वाशी लाईन वरील गाडया सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजे दरम्यान तसेच बांद्रा , अंधेरी, गोरेगाव मार्गावर सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ दरम्यान वाहतुक स्थगीत करण्यात आली आहे.
 
 
विशेष सेवा
मेगा ब्लॉक दरम्यान पनवेल आणि कुर्ला स्थानका दरम्यान फलाट क्र. ८ वरुन विशेष सेवा देण्यात येणार आहे. हार्बरलाईन वरील पॅसेंजर गाडयांना मुख्य मार्ग आणि पश्‍चीम मार्गावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान धावण्यास परवानगी आहे.
ब्लॉक दरम्यान प्रवाशी गाडयांना गर्दी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासा दरम्यान कोणतीही जोखीम घेवू नये. डब्याची पायरी तसेच छतावरुन प्रवास करु नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@