आयपीएलचे दोन 'प्ले ऑफ' पुण्याऐवजी आता कोलकत्तामध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |

 

पुणे : आयपीएल-२०१८ चे दोन प्ले ऑफ सामने हे पुण्याऐवजी कोलकत्ता येथे होणार असल्याचे आयपीएल संचालक मंडळाकडून आज जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचे संचालक राजीव शुक्ला यांनी याविषयी अधिकृत माहिती दिली असून प्ले ऑफ सामन्यांमधील एलमिनेटर आणि क्वालिफायर-२ हे दोन सामने कोलकत्त्यामध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोलकत्तातील ईडन गार्डन मैदानावर येत्या २३ आणि २५ मे रोजी अनुक्रमे एलमिनेटर आणि क्वालिफायर-२ हे सामने खेळवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अगोदर हे दोन्ही सामने चेन्नईच्या होमग्राउंडमध्ये घेण्याचे ठरले होते. परंतु तामिळनाडूमध्ये कावेरी जलवाटपाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या गदारोळानंतर हे सामन्यात पुण्यात घेण्याविषयी चर्चा सुरु होती. परंतु याविषयी ठोस निर्णय मात्र झाला नव्हता. परंतु आता मात्र यावर अंतिम निर्णय झाला असून हे दोन्ही सामने कोलकत्तामध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान पवना धरणाचे पाणी पुण्यातील क्रिकेट मैदानासाठी गैर मार्गाने वापरल्याच्या कारणावरून आज मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला खडसावले आहे. तसेच धरणाचे पाणी गैरमार्गाने क्रिकेट मैदानासाठी वापरणे तातडीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे पुण्यातील सामन्यांना काही अडथळा तर निर्माण होणार नाही ना ? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांसमोर निर्माण झाला होता. परंतु यामुळे सामन्यांवर कसलाही परिणाम होणार नसल्याचे आयपीएल संचालक मंडळाकडून सांगण्यात आलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@