आ. एकनाथराव खडसेंचा मंत्रिमंडळात प्रवेश निश्चित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |
 
 
 
मुंबई, ४ मे :
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिलेले भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश लवकरच होईल असे स्पष्ट संकेत शुक्रवारी भाजपच्या प्रदेश पदाधिकारी आणि मंत्रिमंडळ सदस्यांकडून देण्यात आले.
 
 
आ.खडसे यांच्यावर अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आणि काही वृत्तपत्रांनी पुण्यातील वक्फच्या जमिनीविषयक भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केल्यावर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र चौकशी रखडल्याने जवळपास दीड वर्ष ते मंत्रिमंडळातून बाहेर राहिले. त्यामुळे ते बरेच नाराज झाले होते. मात्र आपण या प्रकरणात दोषी नाही, आपण निर्दोष बाहेर पडू याचा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला.
 
 
आ. खडसे यांच्याबद्दल विचारले असता भाजप कोअर टीमच्या सदस्यांनी तसेच दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी आणि प्रदेश पदाधिकार्‍यांनी त्यांची मंत्रिमंडळात आवश्यकता असून लवकरच त्यांचा शपथविधी केला जाईल असे स्पष्ट संकेत दिले. मात्र त्यांना पूर्वीचे महसूल खाते मिळणार नाही, ते खाते चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे कायम राहील असेही सूत्रांकडून कळते. बहुदा सार्वजनिक बांधकाम किंवा सहकार यापैकी एक महत्वाचे खाते त्यांच्याकडे दिले जाण्याचे
संकेत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@