अखेरकार भुजबळांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |

छगन भुजबळ यांना जमीन मंजूर



मुंबई : अवैध्या मालमत्तेप्रकरणी गेल्या दोन वर्षापासून तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा जमीन अर्ज अखेरकार न्यायालयाने मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज हा अर्ज मंजूर केला असून जामिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच भुजबळ यांना सोडण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान भुजबळ यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजुर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून यावर आनंद व्यक्त करण्यात आला असून भुजबळ यांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीने दिली आहे. तसेच न्यायालयाच्या या निर्णयाचे पक्षाकडून सहर्ष स्वागत करण्यात येत असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी तब्बल दोन वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर अखेरकार भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दोन वर्षामध्ये भुजबळ यांनी आपल्या सुटकेसाठी अनेक वेळा जामीन अर्ज केला होता. परंतु न्यायालयाकडून मात्र हा अर्ज वारंवारपणे फेटाळला जात होता. अखेरकार दोन वर्षांच्या अवधीनंतर हा अर्ज न्यायालयाने मान्य केल्यामुळे भुजबळांसाठी हा खूप मोठा दिलासा मानवा लागेल.
@@AUTHORINFO_V1@@