स्टेडीयमसाठी पाणी घेणे बेकायदा : मुंबई उच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |


मुंबई : औद्योगिक वापराच्या नावाखाली क्रिकेट पिचसाठी पवना धरणातून पाणी घेणे गैर असून हे पूर्णपणे बेकायदा असल्याची प्रतिक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली आहे. पवना धरणाचे पाणी क्रिकेट मैदानासाठी वापरत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि राज्य सरकारचे चांगलीच कानउघडणी केली आहे. तसेच मैदानासाठी म्हणून पवना धरणाचे पाणी वापरणे तातडीने थांबवण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

औद्योगिक वापराचे कारण देत पवना धरणाचे पाणी पुण्यातील गहुंजे येथील क्रिकेट स्टेडीयमच्या मैदानासाठी वापरले जात होते. याविषयी न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि राज्य सरकार या दोघांवर देखील ताशेरे ओढत, हा पूर्ण प्रकार बेकायदा असल्याचे स्पष्ट केले. तसेच असोसिएशनला पाणी वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारला देखील न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले होते. यानंतर हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिली.

तामिळनाडूमध्ये कावेरी जलवाटपाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये होणारे सर्व आयपीएल सामने पुण्यात खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गहुंजे मैदानावर सामने घेतले जाऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर मैदान चांगले ठेवण्यासाठी म्हणून पवना धरणाचे पाणी बेकायदेशीरपणे वापरले जात होते.
@@AUTHORINFO_V1@@