भुजबळ लढवय्ये पुन्हा उभे राहतील : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2018
Total Views |




पुणे :
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ हे एक लढवय्ये असून लवकरच या सर्वांमधून ते बाहेरी पडतील व संघर्ष करून पुन्हा एकदा उभे राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. छगन भुजबळ यांच्या सुटकेवर आनंद व्यक्त करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


भुजबळांना जामीन मिळाल्यामुळे पक्षाला आणि त्यांच्या समर्थकांना अत्यंत आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच भुजबळांना जामीन मिळणे हा त्यांचा न्याय्य हक्क होता. परंतु हक्क मिळायला खूपच उशीर झाला, असे ते म्हणाले. पण जनतेनी भुजबळ यांना अगोदरच निर्दोष ठरवलेले आहे आणि न्यायालय देखील लवकरच त्यांची निर्दोष मुक्तता करेल. त्यामुळे लवकर ते पुन्हा एकदा राजकारणात देखील सक्रीय होतील आणि आपल्या संघर्षाच्या बळावर ते पुन्हा एकदा उभे राहतील, असे विश्वास पवार यांनी वेळी व्यक्त केला. तसेच या संघर्षामध्ये पक्ष देखील त्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहील, असे देखील ते म्हणाले.



भुजबळांच्या सुटकेमुळे पक्षाला बळकटी : जयंत पाटील

 दरम्यान राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील भुजबळ यांच्या सुटकेवर आनंद व्यक्त करत, भुजबळांच्या सुटकेमुळे पक्षाला बळकटी आली असल्याची प्रतिक्रिया दिली. खरेतर गुन्हा सिद्ध झालेला नसताना देखील सलग दोन वर्ष तुरुंगवास भोगावा लागणे हा भुजबळांवर झालेला खूप मोठा अन्याय असून भाजपने त्यांच्या बरोबर सुडाचे राजकारण केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. .


महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगवास भोगत असलेल्या भुजबळ यांना अखेरकार आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ५ लाख रुपयांच्या जामिनावर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतर राज्यभर भुजबळ समर्थकांनी फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला.
@@AUTHORINFO_V1@@