कर्नाटकातील 'त्या' जागेवर कॉंग्रेस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |



बेंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांदरम्यान बोगस मतदान ओळखपत्रांवरून देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या कर्नाटकच्या राजराजेश्वरी नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. राज राजेश्वरीनगरच्या या जागेत पुन्हा एकदा कॉंग्रेसच विजयी झाली असून बोगस ओळखपत्रांचा आरोप असलेले कॉंग्रेस नेते मुनिरत्न हे या ठिकाणी विजयी झाले आहेत. अत्यंत अतितटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये भाजपच्या आर.टी.मुनिराजू गौडा यांचा त्यांनी पराभव केले आहे.

मुनिरत्न यांनी तब्बल २२ हजार ४९२ मतांनी मुनिराजू यांचा पराभव केला असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. आज झालेल्या मतमोजणीनंतर मुनिरत्न यांना एकूण १ लाख ८ हजार ६४ मते मिळाल्याचे, तर मुनिराजू यांना मात्र ८५ हजार ५७२ मते मिळाली असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. दरम्यान कॉंग्रेसमध्ये आणखी एक जागा जमा झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या एका जागेवरील विजयानंतर कर्नाटकात कॉंग्रेसची आणखी जागा वाढली असून कॉंग्रेस आकडा आता ७९ वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान निवडणुकीदरम्यान याठिकाणी पकडल्या गेलेल्या बोगस मतदान ओळखपत्राच्या रॅकेटमुळे कॉंग्रेस पक्ष मोठ्या अडचणीमध्ये आला होता. तसेच या प्रकरणात मुनिरत्न यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तर ही जागा कॉंग्रेस हातातून जाणार असा तर्क अनेकांनी केला होता व त्यामुळे याठिकाणी होणारी निवडणूक देखील रद्द करण्यात आली होती. परंतु या पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसने सर्वांचे तर्क खोटे ठरवत पुन्हा एकदा याठिकाणी विजय मिळवला आहे.
@@AUTHORINFO_V1@@