लोकसभा पोटनिवडणुक : पालघरमध्ये 'कमळ' तर भंडाऱ्यात 'घड्याळ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |


पालघर : पालघर आणि भंडारा येथील लोकसभा जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले असून पालघरची जागा राखण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण यश मिळाले आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपला सपाटून मार खावा लागला असून भंडारा-गोंदिया मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या निकालानुसार पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांचा बहुमताने विजय झाला असून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा तब्बल २९ हजार ५७२ मतांनी दारूण पराभव झाला आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार गावित यांना एकूण २ लाख ७२ हजार ७८२ तर वनगा यांना २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या या दारूण पराभवानंतर पक्षाकडून पुन्हा एकदा भाजपवर इव्हीएम घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून भाजपने आयोग आणि प्रशासनाला हाताशी धरून हा विजय मिळवला असल्याचे शिवसेनेनी म्हटले आहे.

दरम्यान भंडारा-गोंदियामध्ये मात्र भाजपला सपाटून मार खावा लागला असून याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुसंडी मारली आहे. भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर या जागेवर भाजपकडून हेमंत पाटले यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु नागरिकांनी आपला कौल राष्ट्रवादी कॉंग्रेसला देत, राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांना विजयी केले आहे. राष्ट्रवादीच्या या विजयानंतर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली असून भाजपचा पराभव हा भाजपव्हा अकार्यक्षमतेचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपले विजयी उमदेवार कुकडे यांचे अभिनंदन त्यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@