आज जागतिक तंबाकू विरोधी दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |
 
 
 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने तंबाकूमुळे दरवर्षी किमान ३० लाख नागरिकांचा मृत्यू होत असतो. हृदय बिघाड झाल्याने या नागरिकांचा मृत्यू होत असतो असे सांगण्यात आले आहे. तंबाकू खाण्याची सवय तरुणपणी लवकर लागते असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे मात्र आपले हृदय हळूहळू निकामी होत जाते व यामुळे शेवटी हृदयविकार सारख्या आजाराला बळी पडून व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो.
 
 
 
 
 
आजच्या दिवसाचे महत्व पाहता सिनेसृष्टीतील, राजकीय आणि सोशल मीडियावर काही महत्वाच्या व्यक्तींनी तंबाकू पासून दूर रहा असा संदेश दिला आहे. यामुळे हृदय बिघाड होतो तसेच माणसाचे चांगले जीवन नष्ट होण्यास सुरुवात होत असल्याने आजचा दिवस हा जागतिक तंबाकू विरोधी दिवस मानला जातो.  जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने तंबाकू हा मानवी शरीरासाठी सगळ्यात हानिकारक पदार्थ ठरला आहे. यामुळे शरीरात विषारी पदार्थांची वाढ होते व त्यामुळे हळूहळू आपले शरीर निकामी होत जाते. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@