घरफोडी करणार्‍यांना जागा दाखवली..!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |

 

 
शिवसेनेने भाजपनेते चिंतामण वनगांच्या घरात फोडाफोडीचं राजकारण करण्याइतपत खालची पातळी दाखवली, पण मुख्यमंत्री फडणवीस या सगळ्या विकृत राजकारणाला पुरून उरले. पालघरमध्ये शिवसेनेच्या कुटील कारस्थानांना चारी मुंड्या चीत करत फडणविसांनी अक्षरशः सेनेच्या जबड्यात हात घातला आहे आणि त्या जबड्यात दात नसून केवळ कवळी आहे, एका ठोशानिशी ती घशात घालता येते, हेच पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

कैरानामधील पराभवामुळे जनतेने योगींची मस्ती उतरवली,” अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोटनिवडणुकींच्या निकालानंतर दिली. निवडणुकीतील पराभव हाच जर मस्ती उतरण्याचा मापदंड असेल, तर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून जनतेने कोणाची मस्ती उतरवली?, याचंही उत्तर पक्षप्रमुखांनी द्यायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे एकदा म्हणाले होते की, आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारी माणसं आहोत.शिवसेनेने भाजपनेते चिंतामण वनगांच्या घरात फोडाफोडीचं राजकारण करण्याइतपत खालची पातळी दाखवली, पण मुख्यमंत्री फडणवीस या सगळ्या विकृत राजकारणाला पुरून उरले. पालघरमध्ये शिवसेनेच्या कुटील कारस्थानांना चारी मुंड्या चीत करत फडणविसांनी अक्षरशः सेनेच्या जबड्यात हात घातला आहे आणि त्या जबड्यात दात नसून केवळ कवळी आहे, एका ठोशानिशी ती घशात घालता येते, हेच पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. पालघरमधील विजय हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाचाच विजय म्हणावा लागेल. सर्व शत्रू चारी बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न होत असताना, त्यातही मित्रांकडून पाठीमागून वार होत असताना, फडणवीस यांनी विजयश्री अक्षरशः खेचून आणली आणि पालघर हा भाजपचाच बालेकिल्ला आहे, हे या सर्वांना दाखवून दिलं. मुख्यमंत्र्यांच्या ‘साम-दाम-दंड-भेदा’चा खरा अर्थ उद्धव ठाकरेंना कधी समजलाच नाही आणि भविष्यात समजेल, अशीही सुतराम शक्यता दिसत नाही. आपण सत्ताधारी पक्ष आहोत पण सत्तेचा कधीच दुरुपयोग करत नाही. मात्र, असा दुरुपयोग कुणी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, ही मानसिकता निवडणुकीत आपण ठेवली पाहिजे,” हे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं, पण ते शिवसेनेला झेपलं नाही. त्यांना केवळ त्यातलं ‘साम-दाम-दंड-भेद’ दिसलं. शिवसेनेच्या षड्यंत्राचा ‘भेद’ झाल्यानंतर आता तरी त्यांना त्या वाक्याचा अर्थ कळेल, अशी अपेक्षा आहे.

श्रीनिवासला भाजपचे दरवाजे सदैव खुले असतील,” असं निकालानंतर पुन्हा एकदा सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्ता संस्कृतीचं आणि भावविश्वाचंच दर्शन घडवलं. आतातरी श्रीनिवास वनगांना उपरती होते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल; अन्यथा फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या काही दिवसांत ‘मातोश्री’चे दरवाजे श्रीनिवास यांच्यासाठी बंद झाले, तरी आश्चर्य वाटायला नको. मी हा पराभव मानायला तयार नाही,” अशीही एक अगम्य प्रतिक्रिया पक्षप्रमुखांनी या निकालानंतर दिली. काय तर म्हणे, ‘लंबी छलांग लगाने के लिये दो कदम पीछे जाना पडता है.’ कदाचित, आणखी एखाद्या मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाता येईल का, आणखी कोणाच्या घरात फोडाफोडी करता येते का किंवा मग मित्रपक्षाच्या जीवावर सत्तेत राहून त्यांचाच दुस्वास करण्याची आणखी एखादी संधी मिळते का, हे सगळं पाहण्यासाठी शिवसेना ‘दोन कदम पीछे’ जायची भाषा करत असेल परंतु, हे सगळं करूनही जनतेचं मन मात्र काही जिंकता येत नाही, याचाच धडा भाजपच्या पालघरमधील विजयाने घालून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सर्वांना पुरून उरणारे ठरले आहेत. पुढे शिवसेना लंबी छलांग घेईल किंवा अन्य काहीही करेल, परंतु पुन्हा असं घरफोडीचं राजकारण जर केलं तर जनताच त्यांना आपली जागा दाखवून देईल, हेच या निकालाने स्पष्ट झालं आहे.

@@AUTHORINFO_V1@@