भारतीय अर्थव्यवस्थेची गगनझेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |

चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ७.७ टक्क्यांवर




नवी दिल्ली :
जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगभरात कौतुक होत असताना भारतीय अर्थ व्यवस्थेसाठी आणखी खुश खबर समोर आली आहे. २०१७-१८ च्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये देशाच्या जीडीपी हा ७.४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे जगभरातील अर्थतज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजपेक्षा देखील ०.५ टक्क्यांनी हा दर अधिक असून यामुळे देशाने विकासाच्या बाबतीत चीनच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे लवकरच सर्व जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा दबदबा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीमध्ये ही वाढ नोंदवण्यात आली आहे. या अगोदर दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये हा दर अनुक्रमे ६.३ टक्के आणि ७ टक्के इतका नोंदवला गेला होता. यानंतर देशाच्या अर्थ व्यवस्थेमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर २०१८ मध्ये हा दर ७.२ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज अनेक अर्थतज्ञांनी आणि वर्तवला होता. परंतु जीएसटी आणि इतर सर्व आर्थिक सुधारणांनंतर हा दर सर्व अनुमानांना मागे टाकत ७.७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या जगभरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.





देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला असून भारतीय अर्थव्यवस्थेचा सातत्यने होत असलेला विकास यामुळे दिसून येत आहे. अवघ्या वर्षभरामध्येच अर्थव्यवस्थेने ६ टक्क्यांहून थेट ७.७ टक्क्यांवर घेतलेल्यामुळे देशाने चीनी अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकले आहे. यावर्षी चीन जीडीपी दर ६.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही झेप अनेकांकडून कुतूहलाचा विषय  ठरत आहे.
@@AUTHORINFO_V1@@