आशियाई भारत चित्रपट महोत्सवाचे दिल्लीमध्ये समापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आशियाई भारत चित्रपट महोत्सवाचे काल नवी दिल्लीमध्ये समापन झाले. या महोत्सवाचे समापन सिंगापूरचा चित्रपट 'सिंगापूर ड्रिम्स' या चित्रपटाने झाला. या चित्रपट महोत्सवात ११ देशांचे ३२ चित्रपट दाखवण्यात आले. यामुळे आशियातील सगळ्या देशांच्या चित्रपट संकृतीचे दर्शन प्रेक्षकांना पाहायला मिळाले. 
 
 
 
भारत आणि आशिया यांना २५ वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आला होता. तसेच आशिया देशांमध्ये चित्रपटाचे महत्व तसेच त्यांचे तंत्रज्ञान आणि चित्रपट कुशलता यांचे दर्शन घडून यावे यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. भारतीय चित्रपट प्रेक्षक हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट जास्त प्रमाणात पाहतो मात्र या दोन भाषेव्यतिरिक्त इतर भाषांमध्ये देखील चित्रपट बनत असतात. 
 
 
 
त्याचा आनंद घेण्यासाठी तसेच त्यांचे विचार आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. चित्रपटातून एका देशाची संस्कृती काय आहे याचे दर्शन घडत असते त्यामुळे आशिया देशांमधील चित्रपटांचे सादरीकरण केले तर आशिया हा सांस्कृतिक दृष्टीने अधिक जवळ होईल हा या मागचा हेतू आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@