कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2018
Total Views |



कल्याण: कृषी उत्पन्न समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आज होणारी निवडणूक रद्द करण्यात आली आहे. आ. किसन कथोरे यांनी प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. या नियुक्तीमुळे संचालक मंडळाला धक्का बसला आहे.

सध्या राजकारणात अडकलेले कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सभापती रविंद्र घोडविंदे यांनी नुकताच सभापतीपदाचा दिलेला राजीनामा व झालेले आरोप प्रत्यारोप पाहता याचबरोबर कल्याण कृषी उत्पन्न समितीच्या भोंगळ कारभाराला चपराक बसाव, या अनुषंगाने आ. किसान कथोरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे.

२००८ साली बाजार समिती बरखास्त करण्यात आली होती. २००८ ते १० या कालावधीत समितीवर राजेश लव्हेकर यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. प्रशासकीय राजवट संपल्यावर २०११ ला निवडणूक झालेली नाही.संचालक मंडळाची मुदत संपताच तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. यंदाची निवडणूक सप्टेंबरमध्ये अपेक्षित होती, पण अपेक्षेप्रमाणे न होता आ. किसन कथोरे व आ. नरेंद्र पवार यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे संचालक बसविण्याची मागणी केली होती.

यानुसार गुरुवारी हे संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे आज १ जून रोजी होणारी सभापतीपदाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@