आयुक्तांनी घेतला नालेसफाईच्या कामांचा आढावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |



नवी मुंबईः आगामी पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज अतिरिक्त आयुक्त मोहन डगांवकर व रमेश चव्हाण यांच्यासमवेत संबंधित अधिकार्‍यांसह नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व अंतिम टप्प्यात असलेले नालेसफाईचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौर्‍यात त्यांनी सेक्टर १७ वाशी येथील शहरातील मुख्य नाला, अरेंजा कॉर्नर ते कोपरी पेट्रोलपंप येथील मोठा नाला तसेच सेक्टर २८ व २९ वाशी येथील नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचप्रमाणे नेरुळ येथे हर्डीलिया कंपनीजवळील नैसर्गिक नाल्याच्या, बँक ऑफ इंडिया कॉलनीजवळ टाटा प्रेस नजीकच्या नाल्याच्या आणि सी.बी.डी. बेलापूर सेक्टर २ ते सेक्टर ९येथे असलेल्या मोठ्या नाल्याच्या साफसफाई कामांची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहणीद्वारे अवलोकन केली.

मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून केव्हाही मुंबईत दाखल होईल, याची दखल घेऊन नालेसफाईची अंतिम टप्प्यात असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. नाल्यातून काढण्यात येणारा गाळ लगेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी घेऊन जाण्याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे त्यांनी या पाहणी दौर्‍यादरम्यान निर्देशित केले.

पावसाळी कालावधीत उद्भवणार्‍या आकस्मिक अडचणींवर मात करण्यासाठी महापालिका मुख्यालयातील ३६५ दिवस सुरू असणार्‍या मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्षाप्रमाणेच दि. ३० सप्टेंबरपर्यंत वाशी, ऐरोली, सी.बी.डी, बेलापूर व नेरुळ येथील अग्निशमन केंद्रास्थळी अहोरात्र कार्यरत राहणारे आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.



@@AUTHORINFO_V1@@