गणवेशधारी सैनिक हा देशाचा अभिमान : राष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दीक्षान्त सोहळा दिमाखात संपन्न 




पुणे :
गणवेशधारी सैनिक हा देशाचा अभिमान असून तब्बल ६० पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या आणि देशासाठी उत्तमोत्तम अधिकारी दिलेल्या एनडीए सारख्या संस्थेमधून पदवी प्राप्त करणे ही स्नातकांसाठी अभिमान गोष्ट आहे' असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) १३४ व्या दीक्षान्त समारंभ आज पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी म्हणून स्वतः राष्ट्रपती कोविंद हे याठिकाणी उपस्थित राहिले होते. यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

‘'सेवा परमो धर्म’ हे एनडीएचे ब्रीद वाक्य आहे. भारतीय सैनिक हा नेहमी देशाच्या सीमांच्या रक्षणाबरोबरच देशात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये देखील देशातील नागरिकांचे रक्षण करतो. त्यामुळे एनडीएच्या या ब्रीदवाक्याचे प्रत्येकी क्षणी आपल्याला स्मरण होत असते. त्यामुळे नव तरुणांनी देखील या ब्रीदवाक्याचा कधीही विसर पडू देऊ नये' असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

याचबरोबर एनडीएच्या १३४ व्या तुकडीचे संचालन देखील यावेळी घेण्यात आले. अकॅडमी कॅडेट अक्षत राज याने सर्व शाखांमध्ये प्रथम येत राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर छात्रसैनिक सोहेल इस्लाम याने सर्व शाखांमध्ये दुसरा येत रौप्य पदकाचा सन्मान मिळविला. अली अहमद चौधरी याने तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक मिळविले. ‘के’ स्क्वॉड्रनला ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ पुरस्कार मिळाला. विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@