अरे हे काय! नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियामध्ये जावून उडवला पतंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर गेले असून आज त्यांनी चक्क इंडोनेशियामध्ये पतंग उडवला आहे. नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपति जोको विडोडो यांनी मिळून पतंग उडवला आहे. इंडोनेशिया येथील राष्ट्रीय स्मारक येथील प्रदर्शनीचे यावेळी दोन्ही नेत्यांनी पतंग उडवून उद्घाटन केले. 
 
 
 
 
 
नरेंद्र मोदी आणि जोको विडोडो यांना पतंग उडवितांना पाहतांना आसपासच्या नागरिकांना कुतूहल वाटत होते. या प्रदर्शनाचा विषय रामायण आणि महाभारत हा होता. या विषयावर हे दोन्ही पतंग बनवण्यात आले होते. यातून भारत आणि इंडोनेशियाची सांस्कृतिक कला जपण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. 
 
 
 
                                     
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याचा पहिला टप्पा सुरु झाला असून या टप्प्यात प्रथम नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची आज भेट घेतली असून या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमध्ये खूप जुन्या काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत मात्र हे संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा दौरा आहे असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@