'या' राज्याने केली पेट्रोलच्या दरामध्ये कपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |




कोची :
देशभरात पेट्रोलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त असताना आणि राज्य सरकारला अधिभार कमी करण्याची विनंती करत असतानाच, दक्षिण भारतातील केरळ या राज्याने नागरिकांना मात्र दिलासा दिला आहे. देशभरात पेट्रोल दरवाढ होत असतानाच केरळ राज्य सरकारने आपल्या राज्यात पेट्रोलच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली असून पेट्रोलच्या किमतीत १ रुपयांची कपात करण्याचे आदेश केरळ सरकारने दिले आहेत. केरळ सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातून केरळ सरकारचे कौतुक केले जात असून अनेक नागरिकांकडून आपापल्या राज्य सरकारांकडे पेट्रोलवरील अधिभार कमी करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

केरळ राज्याचे अर्थमंत्री डॉ. टी.एम. थॉमस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आज याविषयी प्रस्ताव मांडला होता. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून लावण्यात येणार कर कमी करण्याविषयी थॉमस यांनी म्हटले होते. दरम्यान या करकपातीनंतर केरळ सरकारला वर्षाला ५०९ कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचे देखील त्यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले होते. परंतु नागरिकांना होणार ताप कमी करण्यासाठी म्हणून सरकार हा निर्णय घेण्यास तयार असल्याचे राज्य सरकारने म्हटले व येत्या १ जुलैपासून राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये एक रुपयांची कपात करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.

दरम्यान केरळ सरकारच्या या निर्णयानंतर अन्य राज्यांमधील नागरिकांकडून देखील अशाच प्रकारची मागणी केली जाऊ लागली आहे. पेट्रोलची दरवाढ रोकण्यासाठी राज्य सरकारने एकतर त्यांचा समावेश जीएसटीमध्ये करावा, अन्यथा पेट्रोलवर असलेले सर्व अधिभार रद्द करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@