विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या शुक्रवारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |

७२४२ स्नातकांना पदव्या, ११ जणांना सुवर्णपदके
विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे प्रमुख पाहुणे

 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११३ वा पदवी प्रदान समारंभ शुक्रवार, दि. १ जून २०१८ रोजी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर एम. मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. मुळे प्रमुख पाहुणे या नात्याने दिक्षांत भाषण करतील. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात एकूण ११ जणांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत.
 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वर्षातून दोनदा पदवी प्रदान कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्ष २०१६-१७ मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७,२४२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. यामध्ये पीएचडी पदवी १०४, एम.फिल ५४, पदव्युत्तर पदवी ३००६, पदव्युत्तर पदविका ६३, पदवी ३९९४ आणि पदविका प्राप्त २१ जणांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, सायंकाळच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी ११ ते दुपारी ४ या काळात स्नातकांना पदव्या दिल्या जातील. या पदव्या प्रशासन भवनाजवळील नव्याने बांधण्यात आलेल्या परीक्षा भवना दिल्या जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.
 
सुवर्णपदक विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे -
(विज्ञान व तंत्रज्ञान विभाग)
१. पर्सिस्टंट बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - देवयानी पाटील, सिविल अॅन्ड एन्वायरोन्मेंटल टेक्नॉलॉजी
२. झेनस्टार बेस्ट एसटेक थिसिस गोल्ड मेडल - आकाश हजारी, कॉम्प्युटर अॅन्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी
३. प्राज बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - उदय सुतार, केमिकल अॅन्ड बायो टेक्नॉलॉजी
४. केपीआयटी बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - गंभीर विद्याधर, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी
५. प्राज बेस्ट पीचडी थिसिस गोल्ड मेडल - अनुश्री कोगजे, केमिकल अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी
६. केपीआयटी बेस्ट पीचडी थिसिस गोल्ड मेडल - भूषण गरवारे, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी
७. पर्सिस्टंट बेस्ट पीएचडी थिसिस गोल्ड मेडल - प्रज्ञा दीक्षित, सिविल अॅन्ड एनवायरोन्मेंट टेक्नॉलॉजी
८. फोर्ब्ज मार्शल बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - सायली काळे, मेकॅनिकल अॅन्ड मटेरियल टेक्नॉलॉजी
९. अभिजित एअर सेफ्टी फाऊंडेशन बेस्ट एमटेक थिसिस गोल्ड मेडल - सुधीर माळी, एविएशन टेक्नॉलॉजी
१०. प्रा. बी. जी. देशपांडे गोल्ड मेडल - तायरोन मिरंडा, एम.एस्सी (जिओलॉजी), पहिला क्रमांक, एप्रिल-मे २०१६ परीक्षा
११. अशोका सुवर्णपदक - झोहराझबीन शेख, बीएस्सी बीएड (इंटिग्रेटेड), पहिला क्रमांक, एप्रिल-मे २०१६ परीक्षा
 
@@AUTHORINFO_V1@@