पुणेकरांना अनुभवायला मिळणार सावरकरांचे जीवनचरित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |
 
 
 
 
पुणे : सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई प्रस्तुत अनादी मी...अवध्य मी! नावाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार असून या कार्यक्रमाचा आस्वाद लवकरच पुणेकरांना घेता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सावरकरांच्या जीवनावर आधारित हा कार्यक्रम असणार असून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम असणार आहे.
 
 
 
सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही राष्ट्रवादी विचारांचे संक्रमण करणारी संस्था असून ज्येष्ठ संगीतकार स्व. सुधीर फडके यांनी १९८५ साली या संस्थेची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या वतीने २ जूनला पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रयोजक श्यामची आई फाउंडेशन हे आहे. प्रसिद्ध कलाकारांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. 
 
 
 
या कार्यक्रमात प्रमोद पवार, समीरा गुजर, अमोल बावडेकर, नंदेश उपम, केतकी चैतन्य यांचा सहभाग असणार आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते हे पैलू लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@