मोदींनी दिले कुंभमेळ्याला येण्याचे आमंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |

इंडोनेशियातील भारतीयांशी साधला संवाद




जकार्ता : इंडोनेशियाच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्ता येथे इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची भेट घेतली आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात संस्कार आणि संस्कृतीचे अत्यंत दृढसंबंध असून येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून याठिकाणी असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी भारतात यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
 
 
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची भेट घेतल्यानंतर इंडोनेशियातील भारतीय समुदाने आयोजित केलेल्या संवादाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आज उपस्थित झाले होते. यामध्ये त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना, इंडोनेशियामधील भारतीय नागरिकांनी इंडोनेशियाच्या विकासामध्ये आपले अमुल्य असे योगदान असल्याचे म्हटले. गेल्या पाच पिढ्यांपासून भारतीय नागरिक हे इंडोनेशियामध्ये राहत असून इंडोनेशियाच्या विकासाच्या दृष्टीने हे सर्व जण अथक प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले.



 
तसेच गेल्या चार वर्षांमध्ये मोदी सरकारने भारतामध्ये केलेल्या अनेक विकासकामांची माहिती देखील त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिली. इंडोनेशियातील अनेक भारतीय नागरिकांना भूतकाळात अनेक अडचणींमुळे आणि काही तत्कालीन कारणांमुळे भारत सोडून याठिकाणी यावे लागले. परंतु आता मात्र न्यू इंडियाच्या संकल्पासह भारत अत्यंत वेगाने प्रगती करत असून लवकरच सर्व भारतीयांच्या स्वप्नातील भारत अस्तित्वात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@