नाशिक जिल्ह्यातील धरणात अवघा १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट होत असून आजमितीस जिल्ह्यातील १७ मध्यम, ७ मोठ्या अशा एकूण २४ प्रकल्पांत १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या आठवड्याभरात सुमारे ९ टक्के जलसाठा घटला आहे, तर अनेक धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.
 
जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार, ९१४ दलघफू इतकी आहे. सद्यस्थितीत धरणांत १२ हजार ६९३ दलघफू एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याच पाण्यावर जिल्हावासीयांची पुढील महिन्याची भिस्त अवलंबून आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात ५ टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजपर्यंत १४ टक्के पाणीसाठा होता. गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे आणि कडवा या पाच प्रकल्पांत गेल्या वर्षापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे, तर वाघाड, पुणेगाव, भावली, मुकणे, हरणबारी, नागासाक्या हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा संकेत आहे. मात्र मान्सून लांबल्यास टंचाई समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
 
गंगापूर समूहात ३२ टक्के पाणी  -
शहरवासीयांची तहान भागवणार्‍या गंगापूर समूहात एकूण ३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत समूहात २० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
 
 
धरणे आणि पाणी साठा -   मुकणे ५, वालदेवी २३, कडवा १४, नांदूरमध्यमेश्वर २३, भोजापूर ०, चणकापूर २३, हरणबारी ३, केळझर १२, नागासाक्या १, गिरणा १६, पुनद ३२, माणिकपुंज ०, गंगापूर ३२, काश्यपी ६२, गौतमी गोदावरी १०, आळंदी १४, पालखेड ३४, करंजवण ११, वाघाड ४, ओझरखेड १६, पुणेगाव १०, तिसगाव ७, दारणा ४३, भावली १
 
@@AUTHORINFO_V1@@