नरेंद्र मोदी यांनी घेतली जोको विडोडो यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याचा पहिला टप्पा सुरु झाला असून या टप्प्यात प्रथम नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची आज भेट घेतली असून या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झली. भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमध्ये खूप जुन्या काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत मात्र हे संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा दौरा आहे असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. 
 
 
 
 
 
आशियानमध्ये दोन्ही देशांची सकारात्मक भूमिका ही दोन्ही देशांचे व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी मदत करेल तसेच दोन्ही देशांचे संबंध अधिक घट्ट आणि मजबूत करण्यास मदत करेल असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या जवानांनी बलिदान दिले त्या जवानांचे स्मृतीस्थळ कालीबाटा नेशनल हीरो सीमेट्री येथे जावून श्रद्धांजली अर्पण केली. 
 
 
 
 
 
नरेंद्र मोदी यांचे इंडोनेशियातील जकार्तामध्ये औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी पॅलेसमध्ये उपस्थित मुलांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे विचार आदानप्रदान केले तसेच व्यापार, राजकारण, अर्थकारण या विषयावर चर्चा केली. 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@