'संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नका' : केरळच्या नेत्याची मुखर्जींना विनंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |


केरळ : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे रा.स्व.संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याच्या मुद्दावरून देशात सध्या एक नवा राजकीय वाद सुरु झाला आहे. अनेकांकडून यावर चर्चा सुरु असतानाच आता केरळ विधानसभेच्या एका नेत्याने मुखर्जी यांना चक्क पत्र लिहून याविषयी विनंती केली असून मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे या नेत्याने म्हटले आहे.


रमेश चेनीथाला असे या नेत्याचे नाव असून केरळ विधानसभेचे ते विरोधी पक्ष नेते आहेत. चेनीथाला यांनी मुखर्जी यांना पत्र लिहून त्यांना विनंती केली आहे कि, 'धर्माच्या नावावर देशाला विभक्त करू पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला देशाच्या माजी राष्ट्रपतींनी उपस्थितीत राहू नये. संघाची हिंदू राष्ट्र म्हणून असलेली संकल्पना ही देशाच्या लोकशाही आणि सहिष्णु या प्रतिमेला घातक असून संघ सध्या देशातील लोकशाही तत्वांवर हल्ले करत आहे. त्यामुळे अशावेळी धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे जीवनभर जपणूक करणाऱ्या आणि देशाचे प्रथम नागरिक म्हणून पद भूषवलेल्या व्यक्तीने या कार्यक्रमला उपस्थित राहणे अनाकलनीय असल्याचे चेनीथाला यांनी म्हटले आहे. तसेच संघाच्या या आमंत्रणावर मुखात्जी यांनी पुन्हा एकदा विचार करावा, असे देखील चेनीथाला यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

नागपूर येथे भरलेल्या संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमाला मुखर्जी हे उपस्थित राहणार आहेत. मुखर्जी यांनी संघाचे हे आमंत्रण स्वीकारल्यापासून देशामध्ये डाव्या विचारवंतांकडून आणि संघटनांकडून एकच गदारोळ उठवला जात आहे. अनेकांनी मुखर्जी यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत, मुखर्जी यांनी या कार्यक्रमाला जाऊच नये, अशी मागणी सुरु केली आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण देशभरात ही एकच चर्चा रंगली असून चेनीथाला यांच्या या पत्रामुळे यात पुन्हा एकदा भर पडली आहे.
@@AUTHORINFO_V1@@