एसोफगोटमी शस्त्रक्रियेमुळे वृद्धाला मिळाले जीवनदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |

अन्ननलिकेतून काढली प्लॅस्टिकची कवळी

 
 
 
 
मुंबई : घाटकोपर येथील अहमद खान (६५) यांनी झोपेत प्लॅस्टिकची कवळी गिळली होती. दोन दिवस काही रुग्णालयात एनोस्कोपीच्या माध्यमातून कवळी काढण्याचे प्रयत्न केले परंतु त्याला यश आले नाही. अखेर झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर यांच्या पथकाने थोरॅसिस ऑन्को सर्जन डॉ. तन्वीर मजीद यांच्या मदतीने अत्यंत गुंतागुंतीची कठीण एसोफगोटमी शस्त्रक्रिया करून प्लास्टिकची कवळी बाहेर काढली. यामुळे जीवनदान मिळाल्याची भावना खान यांनी व्यक्त केली.
 
याबाबत बोलताना डॉ. रॉय म्हणाले कि, छाती आणि पोटाच्या वरील भागात असह्य वेदना होत असल्याची तक्रार घेऊन खान रुग्णालयात आले होते. कवळी कुठे आहे पाहण्यासाठी एक्स-रे काढण्यात आला परंतु कवळी प्लॅस्टिकची असल्यामुळे दिसली नाही. मग छाती आणि पोटाचा सिटीस्कॅन करून कवळी कोठे आहे ते शोधण्यात आले. सहा सेंटीमीटरच्या या कवळीने अन्ननलिका व्यापून टाकल्याने खान यांना अन्न गिळणे श्वास घेणे कठीण जात होते. एन्डोस्कोपीच्या माध्यमातून कवळी काढण्याचा तीन वेळा प्रयत्न केला गेला. त्याला यश आले नाही कवळी अडकून ४८ तास झाले होते तसेच रुग्णाची अवस्था पाहता धोका पत्करणे शक्य नव्हते. कवळीमुळे छिद्र पडले असते किंवा किंवा प्रादुर्भाव झाला असता तर रुग्णाच्या जीवावर बेतले असते, असे डॉ. रॉय म्हणाले.
तर झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील थोरिअक ऑकोसर्जन डॉ तन्वीर मजीद यांनी सांगितले कि, रुग्णाची परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती. कारण त्यांचे वय जास्त होते आणि दुसऱ्या रुग्णालयात कवळी काढण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले होते. रुग्णला धूम्रपानाची सवय असल्याने भूल देणे कठीण होते. तसेच अन्ननलिका कापण्यात मोठा धोका असतो ती आपल्या आत गळू शकते त्यामध्ये रुग्ण या घटनेला ४८ तास उलटून गेल्यावर झेन रुग्णालयात आला होता. परंतु रुग्णालयातील तज्ज्ञांच्या पथकाने अन्ननलिका कापून पुन्हा जोडून दिली. आम्ही त्यांच्यावर एसोफगोटमी शस्त्रक्रिया करून अन्ननलिका व्यापणारी बाहेरची वस्तू तेथून काढली.
 
योग्य उपचारामुळे जीव वाचला
 
रविवारी दाताची कवळी पोटात गेली होती. सुट्टी असल्याने योग्य उपचार मिळाले नाही. सोमवारी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे एन्डोस्कोपीच्या माध्यमातून काढण्याचे प्रयत्न झाले त्याला यश आले नाही. काहीच खाता पिता येत नव्हते. परंतु झेन रुग्णालयात आल्यामुळे योग्य उपचार मिळाले आणि माझा जीव वाचला आहे. आता मी सर्वकाही खाऊ पिऊ शकतो.
अहमद खान, रुग्ण
 
@@AUTHORINFO_V1@@