बारावी परीक्षेत कल्याण ग्रामीण भागात जीवनदीप गोवेली कॉलेजची उत्कृष्ट कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |



टिटवाळा : कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाचा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल 95टक्के लागला असून या महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा सर्वाधिक 98.10 टक्के निकाल लागला तर वाणिज्य शाखेचा निकाल 95.10 टक्के आणि कला शाखेचा निकाल 89.20 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतील संचिता भालचंद्र कोळंबे या विद्यार्थिनीने 90.76 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर करुणा नायडू हिने वाणिज्य शाखेत 89 टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे, कल्याण ग्रामीण भागातील सर्वाधिक निकाल जीवनदीप महाविद्यालयाचा आहे. या महाविद्यालयातील 630 पैकी 602 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जीवनदीप महाविद्यालयातील शिक्षकवर्ग नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन उपक्रम राबवित असतात. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टीत अतिरिक्त तासिका घेतल्या जातात.तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यावर महाविद्यालयाचा भर असतो. महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ. के.बी. कोरे व प्रकाश रोहणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील रायते हायस्कूलचा निकाल 79.48 टक्के तर सखाराम शेट विद्यालयाचा निकाल 81.81 टक्के लागला आहे. भारतीय सैनिक खडवली 89.79 टक्के, महावीर कनिष्ठ विद्यालय 57.14 टक्के, जी.के. एस खडवली 64.70 टक्के तर, गणेश विद्यालय टिटवाळा 82.97 टक्के, जी.आर. पाटील मांडा 75 टक्के असा निकाल लागला आहे, या सर्वांत जीवनदीप कॉलेजची कामगिरी अव्वल ठरली आहे.

@@AUTHORINFO_V1@@