‘वॉक विथ कमिशनर’;महापालिकेचा ५ मे रोजी उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |


नाशिक : ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमांंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवार दि. ५ मे रोजी कृषी नगर जॉगिंग ट्रॅक, सायकल चौकाजवळ, नाशिक येथे सकाळी ६.३० वा. महानगरपालिका अधिकार्‍यांसह उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या उपक्रमांतर्गत महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशीथेट सुसंवाद साधणार असून नागरिकांच्या तक्रारी/सूचना जाणून घेणार आहेत व त्यावर उचित कार्यवाही करण्याबाबत प्रशासनास सूचना देणार आहेत.

यावेळी जे नागरिक आपल्या तक्रारी/सूचना/संकल्पना महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करू इच्छितात त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात व त्या ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून उपस्थित असणार्‍या महानगरपालिका विभागीय कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@