...नाहीतर काश्मीरलाच याची फळे भोगावी लागतील : व्ही.के.सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |

काश्मीरच्या रक्षणासाठी काश्मिरी जनतेनीच एकत्र येण्याचे आवाहन



नवी दिल्ली : 'सरकार आणि काश्मिरी जनता यांच्यामध्ये भिंत बनून उभे राहण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाडेकरू दगड फेकणाऱ्यांवर जर आता कारवाई केली नाही, तर भविष्यात काश्मीरलाच याची फळे भोगावी लागतील, असे वक्तव्य केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी केले आहे. तसेच काश्मीरमधील जनतेने आपल्या भविष्यासाठी स्वतःच या दगडफेक करणाऱ्यांविरोधात एकत्र यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

सिंह यांनी आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून काश्मिरी जनतेला यासंबंधी आवाहन केले आहे. 'काटे पेरणाऱ्या व्यक्तीच्या नशिबी फक्त काटेच येतात' असे म्हणत, आज सरकारला विरोध म्हणून दगडफेक करणारे काश्मीरमधील फुटीरतावादी लोक भविष्यात काश्मीरसाठीच डोकेदुखी ठरतील, असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी म्हणून त्यांनी पाकिस्तानचे देखील उदाहरण दिले आहे. पाकिस्तानचे उदाहरण देताना त्यांनी म्हटले आहे कि, भारताला त्रास देण्यासाठी म्हणून आपल्या शेजारील देशाने दहशतवादाचा आश्रय घेतला. परंतु आज त्याच देशाला दहशतवादाचा सर्वात जास्त त्रास होत असल्याचे त्याच देशाने मान्य केले आहे. याचपार्श्वभूमीवर आज काश्मीरमध्ये भारत सरकारला विरोध करायचा म्हणून राज्यातील फुटीरतावादी लोक काश्मिरी जनतेवरच दगडफेक करत आहे. सामान्य नागरिकांची मुले शाळेत जात असल्याचे पाहून या लोकांनी त्यांच्या शाळेच्या गाडीवरचा दगडफेक केली आहे. त्यामुळे आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आता काश्मिरी जनतेनीच या फुटीरतावादी लोकांच्या विरोधात एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@