निरव मोदीकडून कसलीही प्रतिक्रिया नाही : रविश कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |

हॉंगकॉंग अथवा न्यूयॉर्कमध्ये असल्याचे अफवा 






नवी दिल्ली : निरव मोदीचा पासपोर्ट भारत सरकारने रद्द केल्यानंतर मोदीकडून अजून तरी कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी आज दिली आहे. नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याविषयी माहिती दिली, तसेच निरव मोदी हॉंगकॉंगमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये असल्याच्या अफवांवर माध्यमांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



भारत सरकारने निरव मोदीचा पासपोर्ट रद्द केल्यानंतर जगभरातील सर्व संस्थाना तसेच देशांना याविषयी सूचना पाठवलेले आहे. त्यामुळे मोदीने जगातील कोणत्याही देशाकडे व्हिसासाठी अर्ज केल्यास तत्काळ त्याची माहिती भारत सरकारला मिळेल. परंतु अजून तरी हॉंगकॉंग, न्यूयॉर्क अथवा जगातील कोणत्याही देशाकडून याविषयी भारत सरकारला अद्याप सूचना आलेली नाही. त्यामुळे या फक्त अफवा असून यावर विश्वास ठेवला जाऊ नये' असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मोदीचा पासपोर्ट रद्द केल्यानंतर मंत्रालयाने त्याला एक नोटीस पाठवलेली आहे. परंतु या नोटीसला देखील त्यानी अद्याप कसलेही उत्तर पाठलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 

स्वराज जाणार म्यानमार दौऱ्यावर

येत्या १० व ११ तारखेला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या म्यानमार दौऱ्यावर जाणार असल्याचे देखील कुमार यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चा आणि करारांवर याभेटी दरम्यान पुन्हा एकदा चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..

@@AUTHORINFO_V1@@